From 73dcf554624f325ec90d02815c36d92a33c2667f Mon Sep 17 00:00:00 2001 From: Norbert Preining Date: Sat, 12 Jun 2021 03:00:50 +0000 Subject: CTAN sync 202106120300 --- language/marathi/LICENSE.md | 207 +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ language/marathi/README.txt | 8 +- language/marathi/marathi.dtx | 22 +++-- language/marathi/marathi.ins | 4 +- language/marathi/marathi.pdf | Bin 139999 -> 176615 bytes 5 files changed, 227 insertions(+), 14 deletions(-) create mode 100644 language/marathi/LICENSE.md (limited to 'language') diff --git a/language/marathi/LICENSE.md b/language/marathi/LICENSE.md new file mode 100644 index 0000000000..b6e4c1fd62 --- /dev/null +++ b/language/marathi/LICENSE.md @@ -0,0 +1,207 @@ +--- +आलोक नित्यमुक्त परवाना +--- + +पहिली आवृत्ती (९ नोव्हेंबर, २०२०) + +© २०२१ आलोक मराठी नियतकालिक + +ह्या परवान्याची नवीनतम अधिकृत प्रत पुढील दुव्यावर उपलब्ध आहे. + +[https://varnamudra.com/aalok/nityamukta-parwana/](https://varnamudra.com/aalok/nityamukta-parwana/) + +ह्या परवान्याच्या प्रतीचे वितरण मुक्त आहे, परंतु त्यात परस्पर बदल करण्याची परवानगी +नाही. परवान्यातील मजकुरासंदर्भात कोणत्याही तक्रारी, सूचना अथवा सल्ले असल्यास आलोक नित्यमुक्त +परवान्याच्या गिट-पृष्ठावर त्यांची नोंद करावी. गिट-पृष्ठाच्या तक्रारींचे पान पुढील दुव्यावर +सापडेल. + +[https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana/-/issues](https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana/-/issues) + +--- +प्रस्तावना +--- + +आलोक नित्यमुक्त परवाना हा कोणत्याही प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्रीचे वितरण मुक्तपणे करण्यासाठी +लिहिण्यात आलेला एक परवाना आहे. ह्या परवान्यासह वितरित होणाऱ्या सामग्रीची प्रतिमुद्रा +करण्याचा व ती व्यावसायिक अथवा अव्यावसायिक, परिवर्तित अथवा यथामूल स्वरूपात वितरित +करण्याचा अधिकार प्रतधारकास प्राप्त होतो, परंतु ह्या परवान्यासह वितरित होणाऱ्या सामग्रीवर +आधारित अशी सामग्री अथवा मूळ सामग्रीत बदल करून निर्माण केलेली सामग्री वितरित करायची असेल, +तर ती ह्या परवान्यातील सर्व अटींसह वितरित करणे सक्तीचे असते. + +----------------------------------------------------- +तांत्रिक शब्द व त्यांचे अर्थ +----------------------------------------------------- + +* सामग्री - ह्या परवान्यात वापरला गेलेला सामग्री हा शब्द प्रतिमुद्राधिकार लागू असलेल्या + कोणत्याही सामग्रीला उद्देशून येतो. + +* प्रतिमुद्रा - एखाद्या सामग्रीची नक्कल म्हणजे तिची प्रतिमुद्रा. उदा. एखाद्या कागदाची + छायाप्रत अथवा त्याचे काढलेले छायाचित्र ही मूळ कागदी प्रतीची प्रतिमुद्रा होय. + +* प्रतिमुद्राधिकार - कोणत्याही सामग्रीची निर्मिती करणाऱ्या व्यक्ती/संस्थेकडे त्या सामग्रीचे + प्रतिमुद्राधिकार असतात. प्रतिमुद्राधिकार कायद्याद्वारे पुढील हक्क प्रतिमुद्राधिकारधारकास + प्राप्त होतात. + + - प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्रीची निर्मिती प्रतिमुद्राधिकारधारकानेच केली आहे हे + वैधानिकरित्या सिद्ध करण्याचा हक्क. + - प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्रीची पुनर्निर्मिती करण्याचा हक्क. + - प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्रीच्या प्रतींचे वितरण करण्याचा हक्क. + + संदर्भ - [http://www.legalserviceindia.com/article/l195-Copyright-Law-in-India.html](http://www.legalserviceindia.com/article/l195-Copyright-Law-in-India.html) +* मुक्त परवाना - प्रतिमुद्राधिकारधारकास मिळणाऱ्या (वर निर्दिष्ट केलेल्या) तीन हक्कांपैकी + पहिल्या हक्काचे संरक्षण व उर्वरित दोन हक्क प्रत्येक प्रतधारकास प्रदान करणे मुक्त परवान्यांद्वारे + साधले जाते. मुक्त परवान्यासह वितरित झालेल्या सामग्रीची परिवर्तित अथवा यथामूल पुनर्निर्मिती + व तिचे व्यावसायिक अथवा अव्यावसायिक वितरण प्रत प्राप्त झालेली कोणतीही व्यक्ती करू + शकते. काही महत्त्वाचे मुद्दे. + + - मुक्त परवान्यासह प्रतिमुद्राधिकारातील पहिल्या हक्काचे पूर्ण संरक्षण होते. सामग्रीच्या + निर्मात्या/निर्मातीखेरीज अन्य कोणीच वैधानिकरित्या सामग्रीच्या निर्मितीचा दावा करू शकत + नाही, परंतु मूळ मुक्त सामग्रीत बदल केला गेला असेल, तर मात्र बदल करणाऱ्याने/करणारीने बदल + समाविष्ट असलेल्या नव्या संपूर्ण सामग्रीचा प्रतिमुद्राधिकार स्वतःकडे घेऊन मूळ सामग्रीच्या + निर्मात्या/निर्मातीचा श्रेयनिर्देश करणे बंधनकारक असते. + - मुक्त परवान्यासह वितरित होणाऱ्या सामग्रीवर प्रतिमुद्राधिकारधारक तसेच अन्य प्रतधारक शुल्क + आकारू शकतात. + - ज्या सामग्रीत परिवर्तन करण्याचा अधिकार प्रतधारकास आहे, त्याच सामग्रीस मुक्त म्हणता येते. + - ज्या सामग्रीचे व्यावसायिक वितरण करण्याचा अधिकार प्रतधारकास आहे, त्याच सामग्रीस मुक्त + म्हणता येते. + - मुक्त परवान्यासह वितरित झालेल्या सामग्रीची प्रत एखाद्या व्यक्तीकडे असेल, तरी तिचे वितरण + करण्यासाठी कोणीही त्या व्यक्तीवर बळजबरी करू शकत नाही. मुक्त असलेल्या सामग्रीचे वितरण न + करण्याचा अधिकारही प्रतधारकाकडे आहे. + - मुक्त सामग्रीवर आधारित अथवा मुक्त सामग्रीत बदल करून तयार केलेली सामग्री अमुक्त असू शकते. + मुक्ततेची अट असलेल्या परवान्यांचा एक उपवर्ग आहे, त्याबद्दल आता जाणून घेऊ. + +* नित्यमुक्त परवाना - हा मुक्त परवान्यांचाच एक उपवर्ग आहे. ह्या परवान्यांसह वितरित होणारी + सामग्री सदैव मुक्त असते. तिच्या परिवर्तित स्वरूपाचे वितरणदेखील अमुक्त अटींसह करता येऊ शकत + नाही. नित्यमुक्त सामग्रीवर आधारित अथवा नित्यमुक्त सामग्रीत बदल करून तयार केलेली सामग्री + एका नित्यमुक्त परवान्यासह वितरित करण्याचे बंधन प्रतधारकास पाळावे लागते. तसे न केल्यास तो + परवान्याचा भंग ठरतो व त्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आलोक हा एक नित्यमुक्त परवाना + आहे. + +* अनुरूप परवाना - एखाद्या पुनर्निर्मित अथवा परिवर्तित सामग्रीस आलोकव्यतिरिक्त जे अन्य परवाने + चालू शकतात, त्या परवान्यांस अनुरूप परवाने असे म्हटले जाते. अननुरूप परवान्यांसह पुनर्वितरण केल्याचे + आढळल्यास त्या सामग्रीचा परवाना अवैध ठरवण्याचे अधिकार आलोक नियतकालिकाकडे आहेत. + +* परिवर्तन/बदल - मूळ सामग्रीत कोणत्याही प्रकारची भर घालणे, घट करणे, तिचा अनुवाद करणे व + इतर लहानात लहान भेद हे परिवर्तन म्हणून मोजले जातील. मिळालेली प्रतिमुद्रा यथामूल वितरित न + करता तिच्यात केलेला कुठलाही बदल मूळ सामग्रीचे परिवर्तन म्हणून पाहिला जाईल. परिवर्तित + सामग्रीचे प्रतिमुद्राधिकार बदल करणाऱ्या/करणारीने स्वतःकडे घेणे नित्यमुक्त परवान्यांमध्ये आवश्यक + ठरते. असे करताना मूळ सामग्रीच्या प्रतिमुद्राधिकारधारकास श्रेयनिर्देशन करणे हेदेखील बंधनकारक + होय. + +* बीज व फलित - ज्या धारिकेत आज्ञावली लिहिली जाते, तिला बीजधारिका असे म्हटले जाते. एखाद्या + चालकासह चालवल्यास आज्ञावली नेमून दिलेले कार्य पूर्ण करते. अशा वेळी मिळणारी धारिका फलित + म्हणून ओळखली जाते. ग्नू संस्थेचे परवाने व आलोक नित्यमुक्त परवाना हे आज्ञावलीय बीज मुक्तपणे + देण्याची वितरित करण्याची सक्ती निर्मात्यावर/निर्मातीवर करतो. + +----------------------------------------------------- +कोणत्या सामग्रीस लागू? +----------------------------------------------------- + +आलोक नित्यमुक्त परवाना प्रतिमुद्राधिकारप्राप्त कोणत्याही सामग्रीस वापरला जाऊ शकतो, परंतु +ते वितरण करताना सामग्रीची प्रतिमुद्रा कोणत्या स्वरूपातील आहे ह्यावरून तिची परवाना +वापरण्यासाठीची अर्हता ठरते. संगणकबाह्य कोणतीही सामग्री आलोक नित्यमुक्त परवाना वापरू +शकते. उदा. छापील लेखन, छापील छायाचित्रे, फिल्मवर आधारित चित्रपट अथवा छायाचित्रे, रिळावर +आधारलेली ध्वनिमुद्रणे. ही व अशी संगणकबाह्य कोणतीही सामग्री आलोक नित्यमुक्त परवान्यासह वितरित +केली गेली असेल, तर तिच्या पुनर्निर्मितीस व वितरणास निर्मात्याची/निर्मातीची परवानगी आहे असे +मानण्यात येईल. अशा संगणकबाह्य सामग्रीचे संगणकीकृत वितरण करावयाची परवावगी ह्या परवान्यासह +आपसूक मिळत असली तरीही कोणत्याही स्वरूपाचे पुनर्वितरण एखाद्या नित्यमुक्त परवान्यासह करण्याची +अट आहेच व आलोक नित्यमुक्त परवानाच वापरण्याची इच्छा असेल, तर संगणकबाह्य मुक्त सामग्रीचे +संगणकीकरण करताना पुढील मुद्द्यांची काळजी घेण्यात यावी. + +आलोक नित्यमुक्त परवान्यासह संगणकीकृत सामग्रीचे वितरण करावयाचे असल्यास पुढील अटींची पूर्तता करणे +आवश्यक आहे. + +* सामग्रीची निर्मिती मुक्त आज्ञावलीचा वापर करून झालेली असावी. +* फलित सामग्रीचे आज्ञावलीय बीज कुठे पाहता येईल ह्याचा स्पष्ट निर्देश सामग्रीतच केलेला असावा. +* संगणकीय आज्ञावलीचे बीजदेखील एका नित्यमुक्त परवान्यासह वितरित केलेले असावे. + +उदा. एखादा लेखी दस्तऐवज जर पीडीएफ् स्वरूपात वितरित करावयाचा असेल, तर त्याची निर्मिती +करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड/इन-डिझाईन/ॲडॉब अशा अमुक्त आज्ञावल्या वापरू नयेत. अमुक्त +आज्ञावल्यांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या संगणकीकृत सामग्रीचे वितरण आलोक मुक्त परवान्यासह +करता येणार नाही. संगणकीकृत सामग्रीचे वितरण करताना जर तिच्या सार्वत्रिक आज्ञावलीय बीजाचा +निर्देश केला गेला नसेल व सामग्री अमुक्त आज्ञावल्यांचा वापर करून घडवण्यात आली असेल, तर त्या +सामग्रीचा परवाना अवैध ठरवण्याचे अधिकार आलोक मराठी नियतकालिकाकडे आहेत. + +विविध प्रकारची संगणकीय सामग्री व तिचे वितरण करण्यासाठी आम्ही शिफारस करत असलेले स्वरूप +पुढीलप्रमाणे - + +* लेखी दस्तऐवज - युनिकोड प्रणाली, .txt, .tex, .dvi (टेक्-फलित), .pdf (आवृत्ती १.७+ + आवश्यक, मुक्त आज्ञावलीच्या वापर होणे आवश्यक), .odf, .md, .html, .epub, .djvu, .csv +* छायाचित्रे - .flif (उत्कृष्ट गुणवत्तेसाठी), .png, .svg, .jpeg +* ध्वनिफीती - .flac (उत्कृष्ट गुणवत्तेसाठी), .ogg (कमी आकारमान व मध्यम गुणवत्तेसाठी) +* ध्वनिचित्रफीती - .mkv, .webm + +वर नोंदवलेले सामग्रीचे प्रकार व त्यांचे स्वरूप ही एक सर्वसमावेशक यादी नसून, केवळ आमच्या काही +शिफारसी आहेत. ह्याव्यतिरिक्त उपलब्ध असलेल्या मुक्त स्वरूपांसह संगणकावर वितरित होणारी सामग्री +आलोक नित्यमुक्त परवाना वापरण्यास पात्र आहे. मुक्त स्वरूपांची आणखी तपशीलवार यादी पुढील दुव्यावर +पाहता येऊ शकते. + +[https://en.wikipedia.org/wiki/List_of_open_formats](https://en.wikipedia.org/wiki/List_of_open_formats) + +प्रतिमुद्राधिकारप्राप्त सामग्री संगणकीय आज्ञावलीच असेल तर ती मनुष्यास वाचनीय (द्विमान सामग्री +मनुष्यास वाचनीय नसते) स्वरूपात महाजालावर उपलब्ध करून द्यावी. आज्ञावलीय बीज वितरित +करण्यासाठी गिटहबऐवजी गिटलॅब ह्या मुक्त प्रणालीचा वापर करावा असे आम्ही सुचवू. ही एक अट नसून +शिफारस आहे. + +----------------------------------------------------- +वितरणविषयक नियम +----------------------------------------------------- + +* सर्वप्रथम सामग्रीच्या निर्मात्याने/निर्मातीने प्रतिमुद्राधिकार आपले असल्याचा स्पष्ट निर्देश + करावा. तो करताना तारीख अथवा वर्ष स्पष्टपणे नमूद केलेले असावे. तत्पूर्वी प्रस्तुत सामग्रीची ही + कितवी आवृत्ती आहे व कधी प्रकाशित होत आहे तेही नमूद करावे. प्रतिमुद्राधिकाराचा निर्देश पुढील + प्रकारे करणे बंधनकारक आहे. + + > <आवृत्तिक्रमांक>वी आवृत्ती <प्रकाशनाची तारीख>
+ > © <प्रकाशनवर्ष> <निर्मात्याचे/निर्मातीचे नाव> + +* ह्या मजकुराखाली पुढील परिच्छेद लिहिण्यात यावा. + + > ह्या सामग्रीच्या वितरणाचे व प्रतिमुद्रणाचे अधिकार आलोक नित्यमुक्त परवान्यासह मुक्त करण्यात येत + > आहेत. ह्या सामग्रीची यथामूल अथवा परिवर्तित प्रतिमुद्रणे व्यावसायिक अथवा अव्यावसायिक + > स्वरूपात वितरित करण्यास प्रतिमुद्राधिकारधारक संमती देत आहे, परंतु असे करताना वितरकाने + > प्रतिमुद्राधिकारांचा योग्य श्रेयनिर्देश करणे व सामग्री परिवर्तित असल्यास ती ह्याच अटींसह + > वितरित करणे बंधनकारक आहे. ही सामग्री जशी आहे तशी पुरवण्यात येत आहे, पुरवणारा/पुरवणारी + > हिच्याबाबत कोणतीही हमी देत नाही. ह्या (व ह्यावर आधारित) सामग्रीचे अमुक्त वितरण + > बेकायदेशीर मानले जाईल. आलोक नित्यमुक्त परवान्याचा संपूर्ण मसुदा पुढील दुव्यावर वाचता + > येईल. + + > [https://varnamudra.com/aalok/nityamukta-parwana/](https://varnamudra.com/aalok/nityamukta-parwana/) + +----------------------------------------------------- +सामग्रीचे पुनर्वितरण कसे करावे? +----------------------------------------------------- + +* ह्या परवान्यासह वितरित होणाऱ्या सामग्रीच्या परिवर्तित स्वरूपाचे वितरण करायचे असेल, तर + मूळ सामग्रीच्या प्रतिमुद्राधिकारधारकास त्याचे श्रेय पुढीलप्रमाणे द्यावे व त्याखाली नव्या + निर्मात्याने/निर्मातीने प्रतिमुद्राधिकार स्वतःकडे घ्यावेत. उदा. + + > मूळ सामग्री - <सामग्रीचे नाव>
+ > निर्माता/निर्माती - <निर्माता/निर्मातीचे नाव>
+ > निर्मितीवर्ष - <मूळ सामग्रीच्या निर्मितीचे वर्ष>
+ + > आधारित/परिवर्तित सामग्री
+ > <आवृत्तिक्रमांक>वी आवृत्ती <प्रकाशनाची तारीख>
+ > © <प्रकाशनवर्ष> <निर्मात्याचे/निर्मातीचे नाव>
+ +* एखादी सामग्री प्रकाशित झाली तेव्हा मुक्त नसेल, परंतु प्रतिमुद्राधिकारधारकास तिचे नित्यमुक्त + वितरण करण्याची इच्छा असेल, तर त्याने/तिने नित्यमुक्त परवान्यासह त्या सामग्रीची सुधारित + आवृत्ती प्रकाशित करावी. एखादी प्रकाशित अमुक्त सामग्री आलोक नित्यमुक्त परवान्यासह मुक्त + माध्यमांवर प्रकाशित करायची असेल, तरीही त्या सामग्रीच्या प्रतिमुद्राधिकारधारकाशी संपर्क + साधून, त्यांची लेखी परवानगी घेऊन, हा परवाना वापरता येईल. असे करतानादेखील + प्रतिमुद्राधिकार मूळ निर्मात्या/निर्मातीकडेच राहतील. + +--- +अनुरूप परवाने +--- + +आलोक नित्यमुक्त परवान्यास केवळ `ग्नू फ्री डॉक्युमेन्टेशन परवाना` व ग्नू संस्थेचा `जनरल पब्लिक +परवाना` हे दोन परवानेच अनुरूप आहेत. क्रिएटिव्ह कॉमन्सचे परवाने संगणकीय पुनर्वितरणाच्या वेळी +अमुक्त आज्ञावल्यांना प्रतिबंध करत नाहीत, शिवाय आज्ञावलीय बीज देण्याची सक्तीदेखील करत नाहीत, +त्यामुळे सामग्रीची परिवर्तनशीलता कमी होते व सामग्रीची मुक्तता घटते, त्यामुळे क्रिएटिव्ह कॉमन्सचे +परवाने आलोकच्या परिवर्तित सामग्रीकरिता वापरू नयेत. अन्य कोणताही असा परवाना ज्यात +आज्ञावलीच्या मुक्ततेचा विचार केला जातो व प्रतधारकाच्या सुरक्षेचा व स्वातंत्र्याचा विचार केला +जातो, त्या परवान्याचा समावेश अनुरूप परवान्यांमध्ये करता येईल. असा कोणताही परवाना आढळल्यास +आलोकच्या गिट-पृष्ठावर सुधारणांमध्ये तसे नोंदवावे. त्या परवान्याचा ह्या यादीत समावेश केला +जाईल. परंतु (पहिल्या आवृत्तीनुसार) केवळ हे दोन परवानेच आलोक परवान्याकरिता अनुरूप मानले गेले +आहेत. diff --git a/language/marathi/README.txt b/language/marathi/README.txt index 596405c568..80f2bfe8b4 100644 --- a/language/marathi/README.txt +++ b/language/marathi/README.txt @@ -6,14 +6,14 @@ readers an English description is provided at the end. -------------------------------------------------------------------------- आज्ञासंच: marathi लेखक: निरंजन -आवृत्ती: १.६.३ (११ मे, २०२१) +आवृत्ती: १.६.४ (११ जून, २०२१) माहिती: लुआलाटेक् व झीलाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी. इथून पुढे लाटेक्-वरील मराठीच्या स्थानिकीकरणाचे काम ह्या आज्ञासंचामार्फत केले जाईल. तूर्त expex व blindtext ह्या आज्ञासंचांचे स्थानिकीकरण ह्या आज्ञासंचामार्फत पुरवले आहे. संग्राहिका: https://gitlab.com/niruvt/marathi अडचणी: https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues परवाने: आज्ञालेखांकरिता आलोक नित्यमुक्त परवाना (आवृत्ती १.०+) आणि ग्नू पब्लिक परवाना - (आवृत्ती ३.०+). हस्तपुस्तिकेकरिता ग्नू फ्री डॉक्युमेन्टेशन परवाना (१.३+) + (आवृत्ती ३.०+). केवळ हस्तपुस्तिकेकरिता ग्नू फ्री डॉक्युमेन्टेशन परवाना (१.३+) दुवे: https://varnamudra.com/aalok/parwana https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt @@ -30,7 +30,7 @@ readers an English description is provided at the end. -------------------------------------------------------------------------- Package: marathi Author: Niranjan -Version: 1.6.3 (11 May, 2021) +Version: 1.6.4 (11 June, 2021) Description: For conveniently typesetting Marathi language with LuaLaTeX and XeLaTeX. This package will now onwards host localizations needed for Marathi @@ -39,7 +39,7 @@ Description: For conveniently typesetting Marathi Repository: https://gitlab.com/niruvt/marathi Bug tracker: https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues License: `आलोक' copyleft license v1.0+ and GPL v3.0+ for the code. - GFDL v1.3+ for the documentation + GFDL v1.3+ only for the documentation. Links: https://varnamudra.com/aalok/parwana https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt diff --git a/language/marathi/marathi.dtx b/language/marathi/marathi.dtx index 79342dfcf2..dc886c1625 100644 --- a/language/marathi/marathi.dtx +++ b/language/marathi/marathi.dtx @@ -41,14 +41,14 @@ readers an English description is provided at the end. -------------------------------------------------------------------------- आज्ञासंच: marathi लेखक: निरंजन -आवृत्ती: १.६.३ (११ मे, २०२१) +आवृत्ती: १.६.४ (११ जून, २०२१) माहिती: लुआलाटेक् व झीलाटेक् ह्यांच्यासह मराठीचा सुलभ वापर करण्यासाठी. इथून पुढे लाटेक्-वरील मराठीच्या स्थानिकीकरणाचे काम ह्या आज्ञासंचामार्फत केले जाईल. तूर्त expex व blindtext ह्या आज्ञासंचांचे स्थानिकीकरण ह्या आज्ञासंचामार्फत पुरवले आहे. संग्राहिका: https://gitlab.com/niruvt/marathi अडचणी: https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues परवाने: आज्ञालेखांकरिता आलोक नित्यमुक्त परवाना (आवृत्ती १.०+) आणि ग्नू पब्लिक परवाना - (आवृत्ती ३.०+). हस्तपुस्तिकेकरिता ग्नू फ्री डॉक्युमेन्टेशन परवाना (१.३+) + (आवृत्ती ३.०+). केवळ हस्तपुस्तिकेकरिता ग्नू फ्री डॉक्युमेन्टेशन परवाना (१.३+) दुवे: https://varnamudra.com/aalok/parwana https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt @@ -65,7 +65,7 @@ readers an English description is provided at the end. -------------------------------------------------------------------------- Package: marathi Author: Niranjan -Version: 1.6.3 (11 May, 2021) +Version: 1.6.4 (11 June, 2021) Description: For conveniently typesetting Marathi language with LuaLaTeX and XeLaTeX. This package will now onwards host localizations needed for Marathi @@ -74,7 +74,7 @@ Description: For conveniently typesetting Marathi Repository: https://gitlab.com/niruvt/marathi Bug tracker: https://gitlab.com/niruvt/marathi/-/issues License: `आलोक' copyleft license v1.0+ and GPL v3.0+ for the code. - GFDL v1.3+ for the documentation + GFDL v1.3+ only for the documentation. Links: https://varnamudra.com/aalok/parwana https://www.gnu.org/licenses/gpl-3.0.txt @@ -101,7 +101,7 @@ Copy the following files in the following path texmf-dist/tex/latex/marathi \hypersetup{% unicode,% pdfauthor={निरंजन},% - pdftitle={मराठी (आवृत्ती १.६.३, मे २०२१)},% + pdftitle={मराठी (आवृत्ती १.६.४, जून २०२१)},% pdfsubject={लुआलाटेक् व झीलाटेक्-सह मराठीत अक्षरजुळणी.},% pdfkeywords={मराठी, लुआलाटेक्, झीलाटेक्, बेबल, पॉलिग्लॉसिया},% pdfproducer={हायपर्रेफ्-सह झीलाटेक्},% @@ -155,7 +155,7 @@ Copy the following files in the following path texmf-dist/tex/latex/marathi % \author{निरंजन} % \date^^A % {^^A -% आवृत्ती १.६.३ \textemdash\ ११ मे, २०२१\\[1ex]^^A +% आवृत्ती १.६.४ \textemdash\ ११ जून, २०२१\\[1ex]^^A % {\small\textcolor{गिटलॅब}{\faIcon{gitlab}}\quad\url{https://gitlab.com/niruvt/marathi}}^^A % }^^A % @@ -329,7 +329,7 @@ Copy the following files in the following path texmf-dist/tex/latex/marathi %<*package> % \end{macrocode} % \begin{macrocode} -\ProvidesPackage{marathi}[2021-05-11 v1.6.3 झीलाटेक् व लुआलाटेक्-सह मराठीचा सुलभ वापर] +\ProvidesPackage{marathi}[2021-06-11 v1.6.4 झीलाटेक् व लुआलाटेक्-सह मराठीचा सुलभ वापर] % \end{macrocode} % ह्या आज्ञांसह आज्ञासंचाची पायाभूत माहिती पुरवली. डेव्हिड कार्लआयल ह्यांनी गिट % प्रकल्पावर नोंदवलेल्या @@ -401,6 +401,12 @@ Copy the following files in the following path texmf-dist/tex/latex/marathi \pgfkeys{marathi/अंतर/.code=\setstretch{#1}} }% }% +\AtBeginDocument +{% + \@ifpackageloaded{csquotes}{}{% + \RequirePackage[style=british]{csquotes}% + }% +}% \DeclareOption*{\expandafter\बदल\expandafter{\CurrentOption}} \providecommand{\अंतरबदल}[1]{\बदल{अंतर=#1}} \ProcessOptions\relax @@ -474,7 +480,7 @@ Copy the following files in the following path texmf-dist/tex/latex/marathi {% \usepackage{babel}% \babelprovide[% - import, main, maparabic, mapdigits,% + import,main,mapdigits,% counters/स्वर = अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः ॲ ऋ ऌ ऑ,% alph=स्वर,% counters/anka = एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा% diff --git a/language/marathi/marathi.ins b/language/marathi/marathi.ins index 48ce2a4931..40f7f5da40 100644 --- a/language/marathi/marathi.ins +++ b/language/marathi/marathi.ins @@ -6,7 +6,7 @@ \preamble -------------------------------------------------------------------------- -लाटेक् आज्ञासंच मराठी आवृत्ती १.६.३ +लाटेक् आज्ञासंच मराठी आवृत्ती १.६.४ © २०२१ निरंजन ह्या सामग्रीच्या वितरणाचे व प्रतिमुद्रणाचे अधिकार आलोक नित्यमुक्त परवान्यासह मुक्त करण्यात येत @@ -20,7 +20,7 @@ https://gitlab.com/aalok/nityamukta-parwana -------------------------------------------------------------------------- -LaTeX Package marathi v1.6.3 +LaTeX Package marathi v1.6.4 © 2021 Niranjan This program is free software: you can redistribute it and/or modify diff --git a/language/marathi/marathi.pdf b/language/marathi/marathi.pdf index e6c6fdca88..db7b54e22e 100644 Binary files a/language/marathi/marathi.pdf and b/language/marathi/marathi.pdf differ -- cgit v1.2.3